कशी असेल इ पास मिळवण्याची प्रक्रिया

 कशी असेल इ पास मिळवण्याची प्रक्रिया


पोलीस मदत पत्र :-     कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे देशात हाहाकार उडालेला दिसून येत आहे . त्यामुळे राज्यात मोठया प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. सरकार समोर लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय उरलेला दिसून येत नाही. गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकार पावले उचलत आहे.  वाढत असलेल्या रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर येत्या ३० एप्रिलपर्यंत राज्यात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच काल पासून जिल्हा अंतर्गद प्रवासाला बंदी घालण्यात आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा ई-पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज केल्यानंतरच प्रवासाची परवानगी असणार आहे.

जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना अत्यावश्यक कारणांसाठी या ई-पासची आवश्यकता भासणार आहे. नागरिकांना काही महत्त्वाच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई-पास काढावा लागणार आहे. यादरम्यानच्या अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांनी ई-पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आ


हे.

ई-पास मिळविण्याची प्रक्रिया
१) https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला ई-पास मिळवण्यासाठी लॉगिन करावे
२) पेज ओपन झाल्यानंतर ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
३) तुम्हाला पुढे ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा लागले.
४) आवश्यक कागदपत्र येथे जोडावी लागतील.
५) प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावे लागणार आहे.
६) कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा लागेल.
७) ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे, याची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती तपासता येईल