जर न्याय मिळत नसेल तर, सफाई कर्मचार्यांचा कामबंद आंदोलनचा इशारा


 जर न्याय मिळत नसेल तर, सफाई कर्मचार्यांचा कामबंद आंदोलनचा इशारा


कल्याण डोंबिवली कोविड सेंटर मधील सफाई कामगार न्यायासाठी घेणार आंदोलनाचा पवित्रा


( प्रतिनिधी :- शिल्पा सोनी ) - देशात कोरोनाच्या साथीने विस्कळीत झालेले जण जीवन आणि आरोग्य सेवेवर पडलेला ताण पाहता परिस्थिती विदारकतेकडे झुकत चाललेली दिसून येत आहे.  कोरोनारुग्णांची सेवा करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र सरकार उदासीन का असा प्रश्न विचारला जात आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध कोविड सेंटर मध्ये कोरोना रुग्णांची त्याच बरोबर हजारो नागरिकांची सेवा, त्या परिसराची, रुग्णालयाची सफाई असो, या दुर्गंधी निर्माण होऊ नये म्हणून काम करत असलेले सफाई कर्मचारी मेहनत करत आहेत परंतु त्याचा प्रशासनाला  विसर पडत चालला आहे कि काय असे दिसते कल्याण मधील टाटा आमंतरण, आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली,जिमखाना, डोंबिवली, कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील भानुशाली यांच्या शार्प  कंपनीच्या अंर्तगत कंत्राटी महिला व पुरुष सफाई कर्मचार्‍यांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचत मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनचा इशारा दिला आहे, मागील वर्षी कोवीड काळात 12 ,000 रुपये वेतन असताना या वर्षी तीन हजार रुपये कपात करत 9,000 हजार रुपये वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे त्याचबरोबर या जीवघेण्या आजाराला सामोरे सफाई कामगारांच्या आरोग्यासाठी सरकार हवे तेवढे संवेदनशील दिसून येत नाही,  कर्मचार्‍यांच्या आरोग्य बाबत त्यांना कोणताही विमा (इन्शुरन्स) नाही, कोणत्याही सुरक्षेची काळजी नाही त्यांना देण्यात येणारे सुरक्षा किट पी.पी.ई किट अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, मास्क व हॅण्डगलोज सारख्या सुरक्षा कवच संबंधित शार्प सर्विसेस कंपनीकडून मिळत नाही त्याचबरोबर आरोग्य तपासणी नाही, साप्ताहिक सुट्टी, कामावरून काढण्याची धमकी अशा अनेक मुद्यांवर कामगारांची पिळवणूक होत असून आपले आयुष्य ,आपल्या कुटुंबाचे कुटुंबातील सदस्याचे, मुला बाळांचे आयुष्य धोक्यात घालून ते हे काम करत आहे. त्यांची होणारी हेळसांड  महिलांच्या डोळ्यांमधील अश्रूमध्ये स्पष्ट दिसत होती. हेच त्यांचे होणारी हाल थांबली पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. याबाबत कामगारांनी वरिष्ठ अधिकारी यांनाही पत्रव्यवहार केला असून, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी व महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे व इतर उच्च स्तरावर याबाबत माहिती दिली असून अजूनही सर्व कर्मचारी हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती अतिशय गंभीर होत असून या सर्व स्वच्छता कामगारांना न्याय मिळाला पाहिजे तसे न झाल्यास सर्व स्वच्छता कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला असून संबंधित शार्प सर्वीसेस कंपनीने आमच्या मागण्या मान्य नाही केल्यास त्यांनी खुर्ची खाली कराव्यात असा गर्भित इशारा सर्व कर्मचारी वर्गाने दिला आहे . या सफाई कामगाराना न्याय कधी मिळेल ? की न्यायासाठी पुन्हा लोकशाही मार्गाने पुन्हा आंदोलनाला सामोरे जावे लागेल हे पाहावे लागणार आहे.