ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन



ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन


सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात


राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस तर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले. मीरा भाईंदर जिल्हा काँग्रेसच्या वतीने नवघर नाका, भाईंदर पुर्व येथे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आरक्षण रद्द होण्यास तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार असल्याच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. दीड वर्षात काँग्रेस महा आघाडी सरकारने आरक्षणाची बाजू न्यायालयात योग्य प्रकारे मांडली नसल्याने आरक्षण गेल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यावर आम्ही १८ महिन्यात काही न केल्याचे म्हणणाऱ्या फडणवीस सरकारने ५ वर्षे झोपा काढल्या होत्या का असा सवाल  प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केला, प्रत्येक वेळी आपले अपयश झाकण्यासाठी महा आघाडी सरकारवर आरोप करणाऱ्या फडणवीस, पाटील,दरेकर यांचा समाचार नगरसेवक अनिल सावंत यांनी घेतला. केंद्रातील मोदी सरकारला आरक्षणच द्यायचे नाही म्हणूनच कायदे करून तेही सर्व राजकीय पक्षांना अंधारात ठेऊन मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे अधिकार काढून घेतले, ज्या शाहू महाराजांनी १०० वर्षांपूर्वी अठरा पगड जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण लागू केले, त्यामुळे अशा घटकांना न्याय मिळाला, समाज विकसित झाला त्या ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्यास मोदी सरकार व फडणवीस सरकार जबाबदार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत म्हणाले. आता मोदी सरकारला उद्योगपती महत्वाचे वाटू लागल्याने गोर गरीब, दलीत, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या वेदना कळत नसल्याचा आरोप नागणे यांनी करीत आरक्षण रद्द होण्यामागे तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार असून १०६ जणांना घरी बसवल्याने त्यांची पोटदुखी वाढली असून आपले अपयश लपविण्यासाठीच महा आघाडी सरकारला लक्ष केले जात असल्याचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका गीता परदेशी, महिला अध्यक्षा लीला ताई पाटील,कार्याध्यक्ष राकेश राजपुरोहित, एसी- एसटी सेलचे श्याम सहारे यांच्यासह जिल्हा, ब्लॉक, सेल चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.