भाजपचे आंदोलन पोलिसांनी काही मिनिटांतच गुंडाळले

 भाजपचे आंदोलन पोलिसांनी काही मिनिटांतच गुंडाळले 




काशिमीरास्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द कल्यामुळे ओबीसी समाजात नाराजगी पसरली आहे तोच मुद्दा घेऊन राजकीय खेळी करत भाजपा ने आज राज्यात ओबीसी आरक्षण बाबत भूमिका घेत चक्काजाम आंदोलन घोषित केले होते त्यानुसार मिरा-भाईंदर मधिल काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिसर चेकनाका जवळ आंदोलन करण्यासाठी जमलेल्या भाजपच्या आंदोलकानी काही मिनिटातच आपले आंदोलन गुंडाळलेले पाहायला मिळाले आहे.


 ओबीसी च्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन ओबीसींना आपल्या कडे वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आज भाजपा ने केलेला दिसून आला स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द कल्यामुळे ओबीसी समाजात नाराजगी पसरली आहे ओबीसींच्या मतांची टक्केवारी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे या समूहाला आपल्याकडे खेचण्यासाठी हे  भाजपा चे प्रयत्न असल्याचे जाणकारांना कडून ऐकायला मिळत आहे.


 भाजपाने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू केले पण हवा तसा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. गुटबाजीने पोखरलेली भाजपा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.   काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत  देखील भाजपातर्फे चक्का जाम आंदोलन दहिसर चेकनाक्या जवळ करण्यात आले. पण आंदोलन पोलिसांनी लगेच काही मिनिटात हे आंदोलन गुंडाळलेले पाहायला मिळाले आहे. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहायला मिळाला आहे.  मिरा-भाईंदर मध्ये भाजपातील गटबाजीमूळे शहरात दोन ठिकाणी हे आंदोलन केले गेले. देशात कोरोना मुळे देश वेगवेगळ्या संकटाचा सामना करत आहे. देशातील नागरिकांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. विरादक परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोना साथीच्या दोन लहर येऊन गेल्या आहेत तिसरी लाट येण्याच्या मार्गावर आहे. अनेक रुग्ण मिळून येत आहेत पण राजकारण करणाऱ्यांना याचे काही सोयरसुतक पडलेले दिसून येत नाही. कोविड काळात ही  शकडोंची गर्दी जमवून कोरोनाला निमंत्रण देण्याचे काम ही राजकीय मंडळी आंदोलने करून करत आहेत की काय अशी शंका येऊ लागली आहे. 

मिरा-भाईंदर च्या महापौर सह अनेक काशिमीरा विभागातील कार्यकर्ते या आंदोलनात दिसून आले. पण पोलिसांनी याना काही मिनिटेच आंदोलन करू दिले आणि हे आंदोलन गुंडाळण्यास भाग पाडले. काशिमिरा पोलिसांकडून अद्यापपर्यंत आंदोलन करणाऱ्या नेते कार्यकर्त्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अशीच माहिती सूत्रांकडून मिळते आहे.  

मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर  भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. काही सेकंदच पोलिसांनी हे चक्का जाम आंदोलन होवू दिले. या नंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.आज सकाळी ठीक १० वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली त्या आधी ९ वाजल्यापासून भाजपा कार्यकर्ते आंदोलन स्थळी जमायला सुरुवात झाली होती. १० च्या सुमारास प्रवीण दरेकर आले आणि त्यांनी चक्का जाम आंदोलनलाला सुरुवात केली आणि लगेच पोलिसांनी अवघ्या काही सेकंदात आंदोलकांना ताब्यात घेतले.